कुलवृत्तांत कसा वापरावा

अ:परिचय:-  ॐ  ▲  ▼
'साइटचा'-  ही वेबसाइट पूर्णपणे 'युनिकोड स्टॅण्डर्ड' (utf-8) मध्ये केलेली असून ती जगातील लोणत्याही आधुनिक संगणकावर कोणतीही आधुनिक (2005 नंतरची) ऑपरेटिंग सिस्टिम वापरलेली असली आणि कोणताही प्लॅटफॉर्म असला तरी (इतर कोणतेही जादा फॉण्ट किंवा युटिलिटीज् न वापरतां) व्यवस्थित दिसूं शकते. ही साइट पाहण्यासाठीं (वापरण्यासाठीं) देवनागरी की-बोर्ड इनपुट ची गरज नाहीं. तुमच्या संगणकावर कोणताही देवनागरी युनिकोड-फॉण्ट असला तरी हरकत नाही. एकही देवनागरी अक्षर (किंवा शब्द) टाइप न करतां स्क्रीनवर दिसणाऱ्या यादीतून पाहिजे ते अक्षर निवडून काम होवूं शकते.‍ तुमच्या संगणकावर complex script साठी Language-Setting व्यवस्थित केलेले असेल तर देवनागरीतील जोडाक्षरे व्यवस्थित दिसतील (अन्यथा control-panel मधून तसे setting करून घ्या)

ब:-डेटाबेसमधील माहिती:-  ॐ  ▲  ▼
'माहिती अद्ययावत् असते'- (तरीही तुम्ही त्यांत भर घालावी ही विनंती)
साइटवरील डेटाबेसमध्ये माहिती भरतांना निरनिराळ्या व्यक्तींकडे असलेली टिपणे प्रमाणभूत धरून त्यातील सर्वांची माहिती भरलेली आहे. तसेच त्यातील ज्या चुका संबंधित व्यक्तींनीं (लिखित स्वरूपांत) कुल-मंडळाच्या नजरेस आणून दिल्या, त्या दुरुस्तही केलेल्या आहेत. सोहनी-कुलातील प्रत्येक हयात व्यक्तीसाठीं स्वतंत्र फॉर्म भरणे आवश्यक आहे. तसेच त्याबरोबर या प्रकल्पाच्या खर्चातील वाटा म्हणून नोंदणी-शुल्क (रु. 100/-) चेक नें देणें अपेक्षित होते व आहे. तरीही काही जणांची माहिती (किंवा उल्लेख) आणि फोटो या डेटाबेसमध्ये आलेले नसतील तर तसे लिखित स्वरूपांत (पोस्टानें अथवा ई-मेल नें) 'सोहनी-कुल' मंडळाला कळविल्यास त्यांची नोंद लवकरच या डेटाबेसमध्ये करण्यात येईल. (फोटो असल्यास त्यांची .jpg फाइल ईमेलला जोडून पाठवावी) परंतु याचीही गरज नाही. वेब-साइट वर दिसणार्‍या या सोहनी-कुलवृत्तान्तांत कोणीही सोहनी कुलबांधव जगातून कोठूनही इंटरनेट मार्फत नवीन व्यक्तींची On-Line-Entry करूं शकतात. कुलमंडळाचे नेट-अ‍ॅडमिनिस्ट्रेटर दररोज नेटवरून येणार्‍या नोंदी तपासून पास करतील, म्हणजे त्या लगेच मुख्य डेटाबेस मध्ये समाविष्ट होतील. त्याचप्रमाणे घराणी, देवदेवता, कुलाचार, इ. बद्दल काही वेगळी माहिती असल्यास तीही कळवावी ही विनंती.

'हा dynamic वेब-डेटाबेस आहे, पुस्तक नव्हे, किंवा CD ही नव्हे'-
या वेब-डेटाबेसमधील माहिती मध्ये केव्हांही घातलेली भर, किंवा व्यक्तींची नव्यानें केलेली नोंदणी ही त्या-त्या जागेवर (म्हणजे वंशावळींत योग्य त्या ठिकाणी) आपोआप जाऊन बसते. (छापील पुस्तकांत असें करणे अशक्य असल्यानें ती पुरवणींत लिहावी लागते) यामुळे प्रत्येक अपडेट नंतर हा डेटाबेस पूर्णपणे अपडेटेड असेल. पूर्वी छापील पुस्तक-स्वरूपांत असतांना 'वंशावळ' आणि त्यातील व्यक्तीची माहिती वेगवेगळ्या पानांवर असायची, व वाचतांना प्रत्येक बाबतीत दोघांचा परस्पर संबंध लक्षांत घेतल्याशिवाय पूर्ण आकलन होत नसे. संगणकावर हा डेटाबेस पाहतांना 'वंशावळ' आणि माहिती एकाच वेळीं दिसूं शकेल. वंशावळीतच बरीच संबंधित माहिती लिहिलेली असून एकच स्क्रीन पहात असतांना 10 + 2 अशा 12 पिढ्याबद्दलचे सिहावलोकन करतां येते. त्याचप्रमाणे कुलवृत्तान्ताच्या छापील पुस्तकात ज्याप्रमाणे त्यात केलेली परिशिष्टे / सूच्या पाहून आपल्याला पाहिजे त्या प्रकाराने एखाद्या पानावर जाऊन शोध घेतां येतो, त्याचप्रमाणे किबहुना त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे आणि त्यापेक्षां कितीतरी कमी वेळांत (क्षणार्धांत) पाहिजे त्या पद्धतीनें कुलवृत्तान्ताचा तो भाग स्क्रीनवर पाहतां येतो. कुलवृत्तान्त कोणत्याही प्रकारे स्क्रीनवर पाहिला तरी येणारा स्क्रीन हा त्याक्षणापर्यंतचे सर्व बदल विचारांत घेऊन वेब-डेटाबेसमधून येणारे उत्तर (मग ती वंशावळ असो, यादी असो नाहीतर माहिती असो) नेहमीच अप-टुडेट स्वरूपांत दाखविले जाते.

क:- हा कुलवृत्तान्त' कसा पाहतां येईल:-  ॐ  ▲  ▼
'तुम्हाला पाहिजे तसा' पाहता येईल-
अ] छापील टेलिफोन डिरेक्टरी किंवा डिक्शनरी पाहतांना जसें आद्याक्षरा वरून पाहिजे त्या पानावर जातां येते, तसें हा डेटाबेस सुद्धा (पाने उलटत न बसतां)
पाहिजे त्या आद्याक्षराच्या (आणि त्याच बरोबर खाली दिलेल्या इतररही काही मुद्दयांच्या) आधाराने पाहिजे त्या पानावर उघडता येतो; आणि त्या व्यक्तीचे
कुलवृत्तान्तातील स्थान आणि ती व्यक्ती 'मुख्य स्थानीं' धरून येणारा वंशावळीचा स्क्रीन हे दिसतात. ते मुद्दे असे:-
1) व्यक्तीच्या स्वत:च्या नावाचे (मराठीतील) आद्याक्षर (स्क्रीनवरील अ ते ज्ञ यादीतून तुम्ही ते सहज निवडूं शकता)
2) व्यक्तीच्या वडिलांच्या नावाचे (मराठीतील) आद्याक्षर (स्क्रीनवरील अ ते ज्ञ यादीतून तुम्ही ते सहज निवडूं शकता)
3) व्यक्ती पुरूष, कीं स्त्री-माहेरवाशीण, कीं स्त्री-सासुरवाशीण हें माउसचा बाण योग्य तेथे नेऊन क्लिक करून ठरवितां येते.
4) व्यक्तीचे कुलवृत्तान्ताप्रमाणे घराणे व उपघराणे (स्क्रीनवर सर्व घराणी-व-उपघराणी याची यादी दिसते, त्यातून निवडता येते).
5) व्यक्तीचें अंदाजे जन्मवर्ष (संगणक 10 वर्षे मागे व पुढे शोधतो) -मात्र तें कुलवृत्तान्तामध्ये अगोदर नोंदविलेले असले पाहिजे.
  यातील 5 पैकीं 2-3 मुद्दयांची माहिती दिली तरी पुरे होते, कारण येणाऱ्या छोट्याशा यादीतून तुम्ही सहज निर्णय घेऊं शकता.
  पाहिजे ती व्यक्ती निवडल्यावर दिसणारी ओळ वाचून खात्री करून घ्या आणि 'पुढे जा' या बटणावर क्लिक करा कीं झाले;
  एका सेकंदांत तुमच्यासमोर ती व्यक्ती 'मुख्य स्थानीं' धरून येणारा वंशावळीचा स्क्रीन येईल.
त्या स्क्रीनवर काय दिसते हें खाली लिहिलेले आहे.
ब] सोहनी कुलातील सर्व विवाहित पुरूष (पिढी, जन्मवर्ष व घराण्यानुसार वर्गवारी करून) यादी स्वरूपांत
क] सोहनी कुलातील सर्व अविवाहित पुरूष (पिढी, जन्मवर्ष व घराण्यानुसार वर्गवारी करून) यादी स्वरूपांत
ड] सोहनी कुलातील सर्व सासुरवाशिणी [विवाहानंतर सोहनी झालेल्या] (माहेरचे आडनाव, सध्याची पिढी व घराण्यानुसार वर्गवारी करून) यादी स्वरूपांत
इ] सोहनी कुलातील सर्व माहेरवाशिणी [विवाहापूर्वी सोहनी असलेल्या] (सासरचे आडनाव, पूर्वाश्रमीची पिढी व घराण्यानुसार वर्गवारी करून) यादी स्वरूपांत
फ] सोहनी कुलातील सर्व अविवाहित मुली (पिढी, जन्मवर्ष व घराण्यानुसार वर्गवारी करून) यादी स्वरूपांत
ग] सोहनी कुलाच्या घराण्यांच्या यादीतील प्रत्येक घराण्याची (व उपघराण्याची) सविस्तर माहिती
ह] सोहनी कुलाच्या सर्व कुलदैवते व कुलदेवतांचे फोटो व त्याचबरोबर त्या 'देव-देवतां' बद्दलची ज्ञात माहिती.

'वंशावळीच्या स्क्रीनवर काय-काय दिसते'-
एखादी व्यक्ती 'मुख्य स्थानीं' धरून येणारा वंशावळीचा स्क्रीन म्हणजे त्या व्यक्तीची पिढी, त्याच्या अगोदरच्या 9 पिढ्या तसेंच व्यक्तीच्या पुढच्या दोन पिढ्या (म्हणजे व्यक्तीची मुले-मुली आणि नातू-नाती) यातील सर्व पुरूषांची नावे (त्यांच्या पत्नीची नावे), आणि त्यांना मुले-मुली किती, स्त्री-माहेरवाशिणींची नावे [व त्याची सासरची नावे] याचा उल्लेख असेल तसेच प्रत्येक पिढीतील सर्व भावांची (व वहिनींची) नावे, त्यांना मुले-मुली किती, आणि सर्व बहिणी [व त्याच्या सासरची] नावे या सर्व गोष्टी एकाच वेळीं स्क्रीनवर दिसतात. वंशावळ स्क्रीनमध्ये मावत नसेल तर त्याची विन्डो दिसते आणि वर-खाली तसेच डावी-उजवीकडे स्क्रोल (पॅन) करतां येते. स्क्रीनवर डाव्या बाजूला त्या-त्या पिढीचा क्रमांकही दिसतो; तसेच वरच्या बाजूला तें घराणे व उपघराणे यांची नावे दिसतात. माहेरवाशिणींचे विवाहानंतर कुल बदलते व त्यांच्या अपत्यांची संख्याही पूर्वीच्या काळांत मूळ कुलवृत्तान्तांत लिहिण्याची पद्धत नव्हती. परंतु आतां त्यांच्या अपत्यांची संख्या दाखविण्याची व्यवस्था संगणक-प्रणालीत आहे; मात्र त्यासाठीं लोकांनी फॉर्ममध्ये ती माहिती भरून दिली पाहिजे, म्हणजे निदान पुढच्या पिढ्यांना तरी ती कळूं शकेल.

'तुम्हाला कोठूनही कोठेही जाता येते'- (कोणत्याही स्क्रीनवरून पाहिजे तशा उड्या घेतां येतात)
यापैकीं कोणत्याही एका प्रकारे कुलवृत्तान्तातील माहिती स्क्रीनवर पहात असतांना त्यावर असलेल्या धाग्यांद्वारे (links) क्लिक करून...
1) निळ्या चांदणीवर क्लिक करून त्या व्यक्तीच्या सविस्तर माहितीचे पान तुम्ही थेट उघडूं शकता. तेथील धाग्यांद्वारे (links) त्या व्यक्तीचा फोटो (दिलेला असल्यास) पहातां येईल; आणि त्या व्यक्तीच्या वैशिष्ठ्यांचे स्वतंत्र पान (दिलेले असल्यास) पाहतां येईल. तसेंच त्यांच्या विशिष्ट घराणे व उपघराणे यांची सविस्तर माहितीही पहातां येईल.
2) कोणतीही यादी पहात असतांना कोणत्याही व्यक्तीच्या नावावर क्लिक करून ती व्यक्ती 'मुख्य स्थानीं' धरून येणारा वंशावळीचा स्क्रीन पहातां येईल.
3) कोणतीही वंशावळ पहात असतांना त्यातील कोणाच्याही नावावर क्लिक करून ती व्यक्ती 'मुख्य स्थानीं' बदलून येणारा वंशावळीचा स्क्रीन पहातां येईल.
4) कोणतीही वंशावळ पहात असतांना वंशावळीऐवजी वर उल्लेखलेल्या कोणत्याही प्रकारची यादी किंवा त्या घराण्याची माहिती पहातां येईल.
5) कोणत्याही एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर जाण्यासाठीं एका सेकंदाचाही वेळ लागत नाहीं. संगणकावर सर्व गोष्टी अगदी क्षणार्धात् होवूं शकतात.

'माहिती व फोटो प्रिंट करतां येतात'-
तुमच्या संगणकाला प्रिंटर जोडलेला असल्यास, तुम्ही पाहत असलेल्या स्क्रीनवरील मजकुराची किंवा फोटोची थेट प्रिंट घेता येते. मात्र त्याअगोदर कागदाचा आकार, portrait/landscape setting निवडणे व मार्जिन्स ठरविणें या गोष्टी करून Print-Preview पाहून घ्यावा हें बरे.

ड:- नूतनीकरण होत रहाण्यासाठीं:-  ॐ  ▲
'माहितींत काही त्रुटी/चुका असल्यास किंवा नवीन भर टाकण्यासाठीं'-
यांत कोणतीही चूक झालेली नाही, असा दावा आम्ही करत नाही. (पण मुद्दामहून चूक केलेली नाही) जुन्या छापील पुस्तकाचा आधार घेऊन हा डेटाबेस लिहिण्यास सुरवात केलेली आहे व नंतर तुम्हा सर्वांकडून जसे फॉर्म भरून आले, त्याप्रमाणे त्या महितीत भर टाकलेली आहे. एखादी गोष्ट जर फॉर्म-मध्ये भरलेलीच नसेल तर त्याचा अंतर्भाव या डेटाबेसमध्ये झालेला असणे शक्य नाही. या सर्व दुरुस्त्या करण्यासाठीं संबंधित व्यक्तींनीं तशी दुरुस्ती सविस्तर रीत्या पोस्टानें किंवा ई-मेलनें 'सोहनी-कुल-मंडळा' ला कळवावी.(यासाठीं वेगळे शुल्क नाही) त्याची लगेच नोंद घेतली जाईल व पुढच्या अपडेट-मध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात येईल.
'नवीन नोंदणीसाठी फॉर्म'-
  ज्या व्यक्तींसाठीं फॉर्म भरलेलेच नसतील (त्यांचा उल्लेखही कुलवृत्तान्तांत नसेल) अशा प्रत्येकसाठीं एक स्वतंत्र फॉर्म भरून आमच्याकडे (एकत्रित रीत्या पाठविलेत तरी चालेल) वर्गणीच्या रकमेसह पाठवून द्यावेत ही विनंती. हा फॉर्म 'on-line' पद्धतीनेही भरतां येईल; तसेंच फॉर्म या साइटवरूनही डाउनलोड करून घेता येईल. असा भरलेला फॉर्म पोस्टानेही पाठवितां येईल. ई-मेलनेही (पैसे ई-पेमेंट ने सुद्धा) पाठवितां येतील. फॉर्मच्या तळाशीं त्याची माहिती दिली आहे. फॉर्म 'on-line' भरायचा असेल तर आपणाकडे 'मराठी-टाइपिंग-युटिलिटी' (युनिकोड मध्ये) असावी अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे फॉर्ममधील सर्व मुद्द्यांतील मजकूर अगोदर मराठीतून टाइप करून तयार ठेवल्यास तो 'on-line' फॉर्ममध्ये 'copy-paste' पद्धतीनें भरल्यास वेळही वाचूं शकेल.
  मात्र आपण 'निव्वळ मराठीतून टाइप करण्यास अडचण आहे' म्हणून नोंदणी करणे लांबवूं नका. नाइलाज म्हणून मराठी मजकूर 'रोमन-मराठी' मधून (इंग्रजी लिपीतून), किंवा अगदी इंग्रजीतून टाइप करून पाठविला तरी चालेल; कुलवृत्तान्तात नोंदणी करतांना मंडळ त्यातील सर्व नावे 'देवनागरी' लिपीतूनच भरतील.
'या कुलवृत्तान्तात नवनवीन माहिती व प्रोग्रॅमस् येतील'-
  आपल्याकडून आलेल्या प्रतिसादा-नुसार वेळोवेळी (सु. दर महिन्याला) मंडळाकडून हा कुलवृत्तान्त अपडेट करण्यात येईल; त्यामुळे दर महिन्याला याची नवीन आवृत्ती आपोआप निघत जाईल. प्रत्येक 'सोहनी' कुटुंबांत नवीन होणारे विवाहसंबंह, नवीन बालकांचे जन्म, वृद्धांचे निर्वाण इ. गोष्टी भविष्यांतही सारख्या घडणार आहेतच. आपण या घटना व इतर संबंधित माहिती वेळोवेळी 'सोहनी-कुल-मंडळा' ला कळवून कायम अप-टु-डेट ठेवण्यास आम्हाला मदत करावी ही विनंती. हा डेटाबेस MySQL-PHP मध्ये केलेला असून कुलवृत्तान्त पहाण्याच्या सध्या उपलब्ध पद्धतीं-शिवाय अजून वेगळ्या पद्धतीनें पहाण्यासाठीं तसेंच त्यांत अजून नवीन सुविधा देण्यासाठीं नवीन पिढीतील संगणक-तज्ञांना अनेक नव्या कल्पना सुचूं शकतात; त्यांचाही यांत समावेश करतां येईल. त्यासाठीं त्या संगणक-तज्ञांनी 'सोहनी-कुल-मंडळा' शीं संपर्क साधून त्यांच्या कल्पना कळवाव्यात. त्या व्यवहार्य वाटल्यास त्यांना या प्रणालीच्या mysql-php-code चा लागेल तो भाग विनामूल्य दिला जाईल.